corona poetry in marathi
it is the best corona poetry on corona isde effect in marathi

lyrics:
काही दिवसा पासून इथं काय आफत आली
कोरोना व्हायरस आला अन् झालं समद वर खाली

पेपरात अन टिविवर निरा कोरोनाचे चर्चे
व्हॉट्स ऍप अन फेसबुक वर बी पोष्ट कोरोना वरचे

ह्या कोरोना व्हायरस न साऱ्याची देल्ली लाऊन
टाकल्या वानी वागतेत लोकं खोकलतांनी पाहून

गळ्यात गळे घालून संग जे फिरत साथ साथ
आता भेटले जावं त साधा मिळवत नाही हात

पक्के मांसाहारी आता मटण नाही खात
रविवारी बी शिजवते फक्त वरण अन भात

बाहेर कोनी निंगत नाही, घरीच बसून रायते
जिम ग्राउंड अन टॉकीज बी आता रिकाम्या रायते

आधी कोनी बिमार झालं तर मानुस कायजी करत जाय
अन् आता बिमारी माहीत झाली तरी काढता घेते पाय

ह्या कोरोना व्हायरस च्यान मानुस मानसा पासून वेगळा झाला
कवा पासून झोपला होता, आत्ता जरा शुद्धीत आला

जगात मानसाले मानसाचं महत्त्व आता समजलं
सृष्टी सोबत खीलवाड केला की काय होते ते उमजलं

चांगला धडा शिकवला रे देवा,कर आम्हाले माफ
आता स्वच्छ राहू स्वच्छ खाऊ, अन जग ठेऊ साफ

ज्यानले ग्रासलं कोरोना न , त्यानले बरं होऊ दे,
अन् सगळ्या बिमाऱ्या घेऊन त्या कोरोना ले जाऊ दे

-स्नेहमय ️

Follow on youtube:
https://youtu.be/rp4-6SFkVh4

follow our page:
https://www.shayariquotation.com/